-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
-
अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.
-
सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ आणि नंदिनीची विवाह सोहळा पाहायला मिळत आहे.
-
पण, पार्थच्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला पाहिलंत का?
-
पार्थ म्हणजे अभिनेता विजय आंदळकरच्या खऱ्या आयुष्यातील बायकोचं नाव रुपाली झंकार-आंदळकर असं आहे.
-
रुपालीने विजयबरोबर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केलं होतं.
-
‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ याच मालिकेत रुपाली विजयच्या प्रेमात पडली होती. या मालिकेत रुपालीने विजयच्या बायकोची भूमिका साकारली होती
-
विजय आणि रुपालीला एक मुलगी आहे; जिचं मायरा नाव आहे.
-
रुपालीच्या आधी विजय आंदळकरचं लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेशी झालं होतं. पण विजयचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे अभिनेत्याने आणि पुजाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश