-
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर लवकरच प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्नगाठ बांधणार आहे.
-
अंकिता व कुणाल यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.
-
अंकिताने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
“देवाला माहित होतं की, माझ्या हृदयाला तुझी गरज आहे. आता आयुष्यभरासाठी एकत्र होऊयात…” असं कॅप्शन देत अंकिताने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
साखरपुडा सोहळ्यात कुणालने देखील मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
यात सर्वाधिक लक्ष अंकिताच्या साखरपुड्यातील ‘Ring Platter’ने वेधून घेतलं.
-
अंकिता व कुणालच्या साखरपुड्यात कोकणी थीम पाहायला मिळाली. हापूस आंबे, नारळाचं झाड, समुद्रकिनारा, मासे, बोट यांची प्रतिकृती असलेल्या ‘Ring Platter’वर या जोडप्याच्या साखरपुड्याच्या अंगठ्या सजवून ठेवल्या होत्या.
-
हे ‘Ring Platter’ सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. यामध्ये अंकिता व कुणाल यांच्या साखरपुड्याच्या अंगठ्यांची झलक पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, अंकिता व कुणालच्या लग्नासाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व सेलिब्रिटी कोकणात पोहोचले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : clickography व अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम. Ring Platter by tejal_palyekar )
![chhaava movie sarang sathaye as ganoji shirke and suvrat joshi as kanhoji](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/suvrat.jpg?w=300&h=200&crop=1)
“…अन् तळपायाची आग मस्तकात गेली”, ‘छावा’मध्ये सारंग साठ्ये अन् सुव्रत जोशीने कोणत्या भूमिका साकारल्या आहेत? पाहा झलक