-
अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
अंकिता व कुणाल यांचा विवाहसोहळा कोकणात देवबाग येथे पार पडणार आहे. लग्नाआधी ‘कोकण हार्टेड गर्ल’ने खास ‘कॉकटेल पार्टी’चं आयोजन केलं होतं.
-
अंकिता व कुणालने कॉकटेल पार्टीसाठी खास वेस्टर्न लूक केला होता.
-
लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ अतिशय सुंदर दिसत होती. तर, कुणालने सुद्धा यावेळी सूट घातला होता.
-
देवबागच्या समुद्रकिनारी या जोडप्याने लग्नाआधी सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
-
“फक्त मी, तू आणि न संपणारा प्रवास” असं कॅप्शन अंकिताने या फोटोंना दिलं आहे.
-
कुणाल भगत हा रायगड जिल्ह्यातील माणगावचा आहे. त्याच्या घराचं नाव अनुबंध असं आहे. व्लॉगमध्ये याची झलक पाहायला मिळाली होती.
-
अंकिताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
मंदार शेट्ये, धनंजय पोवार, प्रशांत नक्ती असे बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व सेलिब्रिटी अंकिताच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम व clickography )

१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?