-
अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला आहे.
-
अंकिताच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी उपस्थिती लावली होती.
-
कोकणातील परंपरा व संस्कृतीनुसार अंकिता व कुणाल यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. याचे फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लग्नाच्या फोटोंना “वालावलकरांचो थोरलो जावई” असं कॅप्शन अंकिताने दिलं आहे.
-
विवाहसोहळ्यात अंकिता व कुणाल या दोघांनीही पारंपरिक व मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
या दोघांचा लग्नसोहळा कुडाळमधल्या वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडला.
-
गेल्या अनेक दिवसांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या घरी लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे सगळे विधी पार पडल्यावर आता अंकिता व कुणाल साता जन्माचे सोबती झाले आहेत.
-
“माझ्यासारखी बायको तुला मिळतेय, कुणाल तुझं मनापासून अभिनंदन” असं मजेशीर कॅप्शन अंकिताने लग्नाच्या फोटोंना दिलं आहे. तसेच ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या दोन्ही बहिणींनी लग्नात कुणालचा कान पिळल्याचं पाहायला मिळालं.
-
अंकिता आणि कुणालवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम, clickography, ankitak makeupartist )

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती