-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar Wedding) राजेशाही थाटात काल (१६ फेब्रुवारी २०२५) लग्नगाठ बांधली.
-
अंकिता मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नबंधात अडकली.
-
अंकिता व कुणालचा लग्नसोहळा कुडाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल (Shri Lakshmi Narayan Temple, Walaval Kudal) येथे पार पडला.
-
लग्नात अंकिताने पिवळ्या रंगाची सुंदर सिल्क साडी (Yellow Silk Saree) नेसली होती.
-
कुणालने लग्नात पांढऱ्या रंगाचा बाराबंदी कुर्ता (Barabandi Kurta) आणि पिवळ्या रंगाचे धोतर (Yellow Dhotar) परिधान केले होते.
-
अंकिताने लग्नाच्या फोटोंना ‘वालावलकरांचो थोरलो जावई’ असे कॅप्शन (Wedding Photo Caption) दिले आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर अंकिताच्या लग्नातील मंगळसूत्राच्या डिझाईनची (Mangalsutra Design) चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
-
अंकिताच्या मंगळसूत्रात काळे मणी व दोन डवल्या आहेत. मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे.
-
अंकिता व कुणालच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
अंकिता व कुणालचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला (Valentines Day 2025) घरगुती पद्धतीने पार पडला.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
![Daily Astrology in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Daily-Astrology-in-Marathi.jpg?w=300&h=200&crop=1)
२० फेब्रुवारी पंचांग: गुरुवारी गजानन महाराज १२ राशींना कसा देणार आशीर्वाद? तुमचा दिवस आनंदाने सुरु होणार का? वाचा राशिभविष्य