-
चाहत्यांसाठी चित्रपट आणि त्यांचे बजेट खूप उत्सुकतेची गोष्ट असते. IMDb ने आतापर्यंत बनलेल्या सर्वात महागड्या बॉलिवूड चित्रपटांची यादी जाहिर केली आहे.
-
आदिपुरुष (बजेट: ५०० कोटी रुपये)
हिंदी आणि तेलुगू दोन्ही भाषांमध्ये बनलेला हा चित्रपट यादीत अव्वल स्थानावर आहे. हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणाचे आधुनिक रूपांतर आहे आणि राक्षस राजा लंकेशपासून त्याची पत्नी जानकीला सोडवण्यासाठी राम राघवच्या प्रवासाचे वर्णन करतो. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, कृती सेनन आणि सैफ अली खान यांच्यासह इतर कलाकार आहेत. -
द गुड महाराजा (बजेट: ४०० कोटी रुपये)
विकास वर्मा दिग्दर्शित, संजय दत्त, नितू चंद्रा आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासह इतर कलाकारांचा हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धात जामनगरच्या महाराजांनी १००० पोलिश मुलांना वाचवल्याच्या सत्य घटनेवर आधारित एक पीरियड ड्रामा आहे. -
ब्रह्मास्त्र: भाग एक – शिव (बजेट: 375-400 कोटी)
दिग्दर्शक अयान मुखर्जीचा अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वाधिक बजेटच्या चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट एका महासत्ते असलेल्या पुरूषाबद्दल आणि त्याच्या प्रेमिकेविषयी आहे जो ब्रह्मास्त्र, प्रचंड उर्जेचे शस्त्र, त्याच्यावर येणाऱ्या काळ्या शक्तींच्या संकटातून वाचवण्याच्या मोहिमेवर आहे. -
सिंघम अगेन (बजेट: ३५०-३७५ कोटी)
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि सलमान खान यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट रामायणाच्या संदर्भाने बनवण्यात आला आहे. -
बडे मियाँ छोटे मियाँ (बजेट: ३५० कोटी)
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेला अली अब्बास जफरचा हा चित्रपट दोन सैनिकांबद्दल आहे ज्यांचा भूतकाळही त्यामध्ये उलगडण्यात आला आहे. -
जवान (बजेट: ३००-३५० कोटी)
अॅटली दिग्दर्शित शाहरुख खान आणि नयनतारा अभिनीत ‘जवान’ हा चित्रपट देखील सर्वात महागड्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत आहे. -
टायगर ३ (बजेट: ३०० कोटी)
मनीष शर्मा दिग्दर्शित सलमान खान आणि कतरिना कैफचा हा चित्रपट टायगर आणि झोया यांच्याबद्दल आहे, जे देश आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी लढत असतात. -
पठाण (बजेट: २५० कोटी)
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपट देखील या यादीत येतो. हा चित्रपट एका भारतीय एजंटबद्दल आहे जो एक विशेष युनिट तयार करण्याच्या मोहिमेवर असतो. -
फायटर (बजेट: २५० कोटी)
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अभिनीत सिद्धार्थ आनंद यांचा हा चित्रपट एका स्क्वाड्रन लीडर आणि त्याच्या लढाऊ वैमानिकांच्या टीमबद्दल आहे जे एका प्राणघातक मोहिमेसाठी एकत्र येतात व प्राणघातक धोके आणि अंतर्गत बंडखोरीला तोंड देतात. -
मैदान (बजेट: २३५ कोटी)
अजय देवगण अभिनीत हा चित्रपट भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सय्यद अब्दुल रहीम यांच्यापासून प्रेरित आहे, ज्यांना भारतीय फुटबॉलचे शिल्पकार मानले जाते. हेही पाहा- ‘छावा’प्रमाणेच ऐतिहासिक सत्य घटनांवर आधारित ‘हे’ ८ बॉलिवूड चित्रपट अजिबात चुकवू नका…

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल