-
Chhaava box office collection worldwide day 3: छावा चित्रपटाची सगळीकडे चर्चा पाहायला मिळतेय.
-
शुक्रवारी, १४ फेब्रुवारीला छावा हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर जगभरात दमदार कमाई केली आहे.
-
छावाने तीन दिवसांत भारतात १२१.४३ कोटी रुपये कमावले.
-
छावाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा १५० कोटींच्या पुढे गेला आहे.
-
‘छावा’ सिनेमाने जगभरात तब्बल १६४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
१३० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत निर्मिती खर्च वसूल केला आहे.
-
चित्रपटात विकी कौशल व रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
-
अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाचे पात्र साकारले आहे.
-
(सर्व फोटो – विकी कौशल इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?