-
विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
विकी कौशल शिवाय असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. यातील एका अभिनेत्याला चित्रपटातील ‘कवी कलश’ या भूमिकेसाठी खूप कौतुक मिळत आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
खरं तर, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विनीत कुमार सिंग आहे. ज्याने छावामध्ये ‘कविराज’ची भूमिका केली आणि त्याच्या अभिनयाने लोकांना खूरप प्रभावित केले आहे. याआधीही विनीत कुमार सिंगने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
‘छावा’ चित्रपटात, विनीत कुमार सिंह हा छत्रपती संभाजी महाराजांचा खूप जवळचा मित्र आणि समर्थक आहे. ‘कवी कलश’ हे कवी असण्यासोबतच एक महान योद्धा देखील होते. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
चित्रपटात विनीत कुमार आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकताना दिसतो, तर रणांगणावरील त्याची लढाहीही प्रेक्षकांना आवडतेय. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
खूप कमी लोकांना माहिती आहे की विनीत कुमार सिंग हा अभिनेता असण्यासोबतच एक डॉक्टर देखील आहे. त्याच्याकडे परवानाही आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
विनीत कुमार सिंग सीपीएमटी पात्र आहे आणि त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये टॉपवर राहून हे यश मिळवले आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
आर. ए. पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून आयुर्वेद, औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात त्याने पदवी प्राप्त केली आहे.
(Photo: Viineet Kumar Siingh/Insta) -
याशिवाय, त्याने् नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून आयुर्वेदात एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी देखील घेतली आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
विनीत कुमार सिंग हा एक अभिनेता आणि डॉक्टर असण्यासोबतच एक चांगला खेळाडू देखील आहे. तो राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल खेळला आहे. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला खरी ओळख २०१२ मध्ये आलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून मिळाली ज्यामध्ये त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)
-
याशिवाय, विनीत कुमार सिंगने मुक्काबाज, अग्ली, गोल्ड आणि गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. (Photo: Viineet Kumar Siingh/Insta)हेही पाहा- मुघलांना रणांगणात पाणी पाजणाऱ्या मराठ्यांच्या ‘या’ शस्त्रानं गाजवल्या अनेक लढाया…

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?