-
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने तेलगू, कन्नड, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत भरपूर काम केले आहे.
-
रश्मिका मंदानाला नॅशनल क्रॅश म्हटले जाते.
-
तिचा चित्रपट ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या पार पडला आहे.
-
अभिनेत्रीचे इतर सुपरहिट चित्रपट कोणते ते जाणून घेऊया;
-
१. पुष्पा २ : पुष्पा २ हा वर्ष २०२४ चा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटाने भारतात १,४७१ कोटींची कमाई केली आहे.
-
२. ॲनिमल : रश्मिका मंदानाचा रणबीर कपूरसोबतचा ॲनिमल हा चित्रपट त्याच्या कथा, संवाद आणि चित्रपटाच्या काही दृश्यांमुळे चर्चेत होता. हा चित्रपटही हिट ठरला होता. या चित्रपटाने भारतात ५५३.८७ कोटींची कमाई केली होती.
-
३. पुष्पा : द राइज रश्मिका मंदानाने दिलेला तिसरा सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘पुष्पा : द राइज’. या चित्रपटाने भारतात १७८.१४ कोटींची कमाई केली होती.
-
४. वारिशु: चौथ्या क्रमांकावर वारिशु हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात १७८.१४ कोटींची कमाई केली होती. (फोटो सौजन्य : पिंटरेस्ट)
-
५. सरिलेरु नीकेव्वरू: सुपरहिट चित्रपटांच्या यादीतील पुढचे नाव सरिलेरु नीकेव्वरू असे आहे, ज्यामध्ये महेश बाबू रश्मिकासोबत होते. या चित्रपटाने भारतात १६९.५५ कोटींची कमाई केली होती. (फोटो सौजन्य : स्टुडिओ फ्लिक्स)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”