-
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती सगळीकडे उत्साहात पार पडत आहे. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे देशासह जगभर कौतुकाचा विषय आहेत.
-
त्यांच्या जाज्वल्य कर्तृत्वाने भारावून जात अनेक मालिका- चित्रपट त्यांच्या जीवनावर तयार केले जातात. आतापर्यंत त्यांचं पात्र अनेक कलाकार अभिनेत्यांनी साकारले आहे. चला शिवजयंतीदिनी याचबद्दल जाणून घेऊ..
-
मराठी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात चंद्रकांत-सूर्यकांत या जोडीतले अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सूर्यकांत यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर लोक मुजरा करत असत, असं काही ज्येष्ठ लोक सांगतात. स्वराज्याचा शिलेदार, पावनखिंड, धन्य ते संताजी धनाजी हे त्यांचे काही चित्रपट.
-
ऐतिहासिक भूमिकांचं आवाहन लीलया पेलणाऱ्या अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या अगदी मनात उतरले. चित्रपट, नाटके, मराठी- हिंदी मालिकांमध्येही त्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली आहे.
-
२००९ सालच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली. हा चित्रपट, त्यातली गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
-
अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या फत्तेशिकस्त, शेर शिवराज, पावन खींड, फर्जंद या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
-
स्वराज्यरक्षक संभाजी या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या मालिकेत शंतनू मोघे याने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. तसेच २०२३ मधील रावरंभा या मराठी चित्रपटातही त्याने साकारलेल्या शिवरायांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.
-
अभिनेता शरद केळकरने ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात छत्रपतींची भूमिका साकारली. वीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
अभिनेता गश्मीर महाजनीने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे.
-
‘हिरकणी’ या स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात प्रसाद ओकने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पण त्याच्या या भूमिकेनं जास्त लक्ष वेधलं नाही.
-
अभिनेता भूषण प्रधान याने जय भवानी जय शिवाजी या स्टार प्रवाहवरील मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…