-
अभिनेता विकी कौशल याने किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आज दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्याने अभिवादन केले.
-
शिवजयंतीचे औचित्य साधून विकी कौशल रायगडावर आला होता.
-
यावेळी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि चाहते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात विकी कौशलचे किल्ले रायगडवर स्वागत करण्यात आले.
-
शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती. त्यानुसार आज सकाळी तो पाचाड येथे दाखल झाला.
-
रोप वे मार्गाचा वापर करून तो गडावर दाखल झाला. यावेळी राज्यसदरेवर जाऊन त्याने मेघडांबरीतील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. महाराजांना अभिवादनही केले.
-
यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावाची टीमसुद्धा उपस्थित होती.
-
छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
विकीच्या अभिवादनाच्या या खास प्रसंगातील एक अप्रतिम क्षण
-
सर्व फोटो साभार- विकी कौशल इन्स्टाग्राम
हेही पाहा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवनेरी’चा इतिहास काय? किल्ल्याने पाहिल्या ‘या’ राजवटी…
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही