-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त युवा किर्तनकार शिवलीला पाटीलने खास फोटोशूट केलं आहे.
-
मराठमोळा पारंपरिक लूक करत तिने हे फोटोशूट केलं आहे.
-
या खास लूकमध्ये तिने जयंतीदिनी शिवरायांना अभिवादन केले आहे.
-
यावेळी तिने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहेे आणि पारंपरिक दागिन्याचा साज केला आहे.
-
यावेळी तिने कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि केसांत गजरा माळला आहे.
-
“स्वाभिमान हिंदुत्वाचा, सौभाग्य जिजाऊच्या विचारांचा”, असं फोटोकॅप्शन शिवालीलाने या फोटोंना दिलं आहे.
-
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत असून तिचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत
-
दरम्यान, शिवलिला पाटील किर्तनांसाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभाग घेतला होता. (सर्व फोटो साभार- शिवलिला पाटील इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”