-
‘झी मराठी’ वाहिनीवर २०२१ मध्ये ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अमृता पवार वैयक्तिक आयुष्यात जुलै २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली.
-
आता लग्नाला अडीच वर्षे झाल्यावर अमृताने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
अमृता पवारने २०२२ मध्ये नील पाटीलशी लग्न केलं. तिचा पती सिनेविश्वापासून दूर असून व्यवसायाने इंजिनीअर आहे. या जोडप्याने लग्नाला अडीच वर्षे झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अमृता आणि नील लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
“Baby on the way” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
-
अमृताचं डोहाळेजेवण सुद्धा नुकतंच पार पडलं आहे.
-
हिरव्या रंगाची सुंदर साडी, त्यावर फुलांचे दागिने या लूकमध्ये अभिनेत्री डोहाळेजेवणासाठी तयार झाली होती. तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी या डोहाळेजेवणासाठी उपस्थिती लावली होती.
-
सध्या अमृतावर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
अमृताने आतापर्यंत ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेसह ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता पवार इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”