-
‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक सदस्य महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाले. यापैकीच एक म्हणजे मीनल शाह.
-
‘रोडीज’सारखा शो केल्यावर अभिनेत्री मीनल शाहने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री घेतली होती. या शोमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली होती आणि घराघरांत तिला एक वेगळी ओळख मिळाली. आता वैयक्तिक आयुष्यात मीनल नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
-
मीनलने गोव्यातील राहत्या घरी आपल्या बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न केलं आहे. अचानक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मीनलने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
अभिनेत्री लिहिते, “आय लव्ह यू तथागत… आम्हाला आमच्या प्रियजनांकडून मिळालेलं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. मला खूप काही सांगायचंय पण, माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.” या सुंदर कॅप्शनसह मीनलने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
मीनल शाहने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
नारिंगी रंगाची सुंदर साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये मीनल खूपच सुंदर दिसत होती.
-
मीनलच्या लग्नाला ‘बिग बॉस शो’मधली तिची जिवलग मैत्रीण सोनाली पाटील सुद्धा उपस्थित होती.
-
सध्या संपूर्ण कलाविश्वातून मीनलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
हळद, संगीत, लग्न अशा फोटोंनी सजलेला मीनलचा वेडिंग अल्बम चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मीनल शाह इन्स्टाग्राम, weddingsbysonders )
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख