-
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा कुडाळ येथे थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. लग्न झाल्यावर अंकिता पती कुणालसह आपल्या सासरी म्हणजेच माणगावला गेली होती.
-
कुणालच्या माणगावच्या घरी या जोडप्याचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. अंकिताच्या स्वागतासाठी तिच्या सासरच्यांनी खास तयारी केली होती.
-
‘कोकण हार्टेड गर्ल’ व कुणालसाठी सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती.
-
अंकिताचं सर्वप्रथम औक्षण करण्यात आलं. यानंतर या दोघांनी एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले.
-
अंकिता उखाणा घेत म्हणते, “समुद्रकिनारी जुळल्या गाठी कुणालचं नाव घेते साता जन्मासाठी!”
-
तर, कुणालने “सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी” असा खास उखाणा आपल्या बायकोसाठी घेतला आहे. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कुणालने ‘कोकणपरी’ हे गाणं खास अंकितासाठी लिहिलंय.
-
गृहप्रवेश करताना मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये नवी नवरी अंकिता अतिशय सुंदर दिसत होती.
-
अंकिता व कुणालने गृहप्रवेश केल्यावर केक सुद्धा कापला. यावर ‘मिस्टर अँड मिसेस भगत’ असं लिहिण्यात आलं होतं.
-
सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकरने शेअर केलेल्या व्हिडीओतून स्क्रीनशॉट )
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…