-
बालिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटही पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होत आहेत, मार्च महिन्यामध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांबद्दल जाणून घेऊयात…
-
L2 Empuran
मोहनलाल यांचा आगामी चित्रपट ‘L2 Empuraan’ २७ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. -
द डिप्लोमॅट
‘द डिप्लोमॅट’ हा ७ मार्च रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत रक्षाबंधन फेम सादिया खतीब दिसणार आहे. चित्रपटात जॉन अब्राहमने भारतीय डिप्लोमॅट जे. पी. सिंग यांची भूमिका साकारली आहे. -
केसरी वीर
‘केसरी वीर’ चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पांचोली योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात विवेक ओबेरॉय नकारात्मक भूमिकेत आहे. सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. -
पिंटू की पप्पी
‘पिंटू की पप्पी’मध्ये टायगर श्रॉफ, सुशांत थमके, जान्या जोशी, विधि यादव, विजय राज, गणेश आचार्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. -
तुमको मेरी कसम
अनुपम खेर यांचा ‘तुमको मेरी कसम’ हा चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. हा चित्रपट इंदिरा IVF चे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांच्या जीवनावरून प्रेरित आहे. या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त ईशा देओल, अदा शर्मा आणि इश्वाक सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. -
बैदा
अभिनेता सुधांशू राय.यांचा सायन्स फिक्शन सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट ‘बैदा’ २१ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुधांशू राय यांच्याबरोबर शोभित सुजय, मनीषा राय, हितेन तेजवानी, तरुण खन्ना, अखलाक अहमद आझाद आणि सौरभ राज जैन दिसणार आहेत. -
(सर्व फोटो साभार: सोशल मीडिया)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन