-
‘टाईमपास’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. या सिनेमात त्याने साकारलेली ‘दगडू’ची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.
-
प्रथमेशने वैयक्तिक आयुष्यात २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्षितीजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी ३ वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं.
-
प्रथमेशच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांचा लाडका ‘दगडू’ आपल्या पत्नीसह परदेशी गेला आहे.
-
प्रथमेश आणि क्षितीजा थायलंड फिरण्यासाठी गेले आहेत. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना अभिनेत्याने खास कॅप्शन दिलं आहे.
-
प्रथमेश व क्षितीजा लिहितात, “आताचं लग्न झालं म्हणत असताना आता एक वर्ष पूर्ण झालंय आणि हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.”
-
“आज नवरा – बायको म्हणून आम्ही एक वर्षाचे झालो. थायलंडमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलोय…इथून आम्ही असंख्य आठवणी आमच्याबरोबर घेऊन येणार” असं या जोडप्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
प्रथमेश आणि क्षितीजाने थायलंडच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
-
या दोघांच्या फोटोंवर त्यांचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब व क्षितीजा इन्स्टाग्राम )
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन