-
मराठी मनोरंजन सृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, जे इतर क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरेच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री पल्लवी सुभाष.
-
नुकतेच पल्लवी सुभाषने इन्स्टाग्रामवर ग्रे रंगाच्या आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पल्लवी आधीपेक्षा थोडी वेगळी दिसत आहे. पण अभिनयक्षेत्रापासून दूर राहून पल्लवी सध्या काय करते, माहितीये का?
-
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने पल्लवीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
-
मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण हा लोकप्रिय चेहरा कालांतराने हळूहळू दिसेनास झाला.
-
२०१४ला प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटात पल्लवी शेवटची दिसली. त्यानंतर पल्लवी फारशी दिसली नाही.
-
पल्लवी अभिनय क्षेत्रापासून दूर राहून जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. मराठी, हिंदी, दाक्षिणात्य भाषांमध्ये ती जाहिराती करत आहे.
-
गेल्या वर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाली की, मी अनेक वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. मी जाहिरातींच्या चित्रीकरणात रमली असून आजवर मी मराठी, हिंदी, दाक्षिणात्य भाषांमध्ये जाहिराती केल्या आहेत. हे माझं आवडतं क्षेत्र आहे.
-
पुढे पल्लवी सुभाष म्हणाली, “आजवर मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मी जे-जे काम केलंय त्याबद्दल मी समाधानी असून मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतं. भविष्यात मला चरित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.”
-
सर्व फोटो सौजन्य – पल्लवी सुभाष इन्स्टाग्राम
Vasant More : वसंत मोरेंचा गंभीर आरोप; “स्वारगेट आगारात रोज बलात्कार होत आहेत, बसेसचं लॉजिंग करुन…”