-
अभिनेत्री-इन्फ्लुअन्सर प्राजक्ता कोळीने २५ फेब्रुवारी रोजी तिचा प्रियकर वृषांक खनालशी लग्न केले. कर्जतमधील ओलिअँडर फार्म्समध्ये हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात झाला. लग्न करण्यापूर्वी हे जोडपे ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
पारंपारिक मेहंदी समारंभासाठी, प्राजक्ताने साधा कोरल कुर्ता सेट घातला होता, तर वृषांकने बेज रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
नंतर प्राजक्ताने अनिता डोंगरेने डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. जे SEWA च्या महिला कारागिरांनी हाताने भरतकाम केले होते (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
तर वृषांकने अनिता डोंगरेने डिझाईन केलेल्या कस्टम एम्ब्रॉयडरी नेहरू जॅकेट सेट परिधान केला होता. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
तिच्या हळदी समारंभात तिने रोजेने बनवलेला गोटा पट्टीचा आयव्हरी शरारा घातला होता, तर वृषांकने मॅचिंग कुर्ता सेट घातला होता. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
त्यांच्या लग्नात, वधू आणि वर दोघांनीही कस्टम अनिता डोंगरे परिधान केले होते. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
रिसेप्शनसाठी प्राजक्ताने पारंपारिक नथांसह लाल बनारसी सिल्क साडी परिधान केली होती. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम)
-
वृषांकने नेपाळी पुरुषांचा पारंपरिक काळा दौरा सुरुवाल हा कोट, पारंपारिक नेपाळी खुकुरी ब्रोच घातला होता. स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
युवाचे सह-संस्थापक निखिल तनेजा यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमात, हे जोडपे नेपाळी पोशाखात दिसत आहे. (स्रोत: प्राजक्ता कोळी/इंस्टाग्राम)
-
प्राजक्ता कोळीच्या लग्नाची इतकी चर्चा होण्यामागे तिने अनेक पारंपरिक गोष्टींना छेद देत लग्न केलं. सहसा लग्नकार्यांमध्ये पुरुष पुरोहित लग्नाचे विधी करतात. मात्र, प्राजक्ताने तिच्या लग्ना महिला पुरोहितांना आमंत्रण देऊन त्यांच्याकडून लग्नाचे विधी करून घेतले. तिच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय. (Photo – Angoori Babe)
Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”