-
मराठी कलाविश्वातील ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालेलं आहे. यानिमित्त चव्हाण कुटुंबीय कोकणात गेले आहेत.
-
पूजाचा पती सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियात असतो. पण, हे जोडपं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मायदेशी परतलं आहे. सध्या चव्हाण कुटुंबीय कोकणात देवदर्शनासाठी पोहोचले आहेत.
-
पूजाचे सासू-सासरे, दीर अन् जाऊबाई असे सगळेजण कोकण फिरायला गेले आहेत. याचे फोटो सिद्धेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सिद्धेशने या फोटोंना ‘फॅमिली ट्रिप टू कोकण’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
पूजाने या फोटोंमध्ये निळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे.
-
पूजाच्या दीराचं नाव आशिष चव्हाण असून तिच्या जाऊबाईचं नाव डायना डिक्रुझ असं आहे. दीर आणि जाऊबाईंसह पूजाने खास फोटोशूट केलं आहे.
-
अभिनेत्रीचे सासू-सासरे या फोटोत देवदर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा आणि तिच्या सासूबाईंनी सारख्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या.
-
पूजाचा पती सिद्धेश चव्हाणने शेअर केलेल्या या फॅमिली फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
कोकणातील मंदिर, गावचं घर यांची झलक देखील सिद्धेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. (फोटो सौजन्य : सिद्धेश चव्हाण इन्स्टाग्राम )
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल