-
सुश्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना आयुष्यातील गोष्टी दाखवत असते.
-
अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या मुली रेनी आणि अलिसाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुश्मिताच्या मुली पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. सुश्मिता सेनही त्यांच्याबरोबर एका फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने डिझायनर नीता लुल्ला यांचेही आभार मानले आहेत. त्यांनी हे ड्रेस तयार केले आहेत.
-
रेनी आणि अलिसा लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहेत.
-
रेनीने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, तर अलिसा मिंट ग्रीन आउटफिटमध्ये दिसत आहे.
-
अभिनेत्रीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे आणि ते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
दरम्यान, सुश्मिता सेनने २००० मध्ये रेनी आणि २०१० मध्ये एलिसाला दत्तक घेतले होते.
-
(सर्व फोटो साभार- सुश्मिता सेन इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल