-
बॉबी देओलच्या प्रसिद्ध वेब सीरिज ‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनचा भाग २ प्रदर्शित झाला आहे.
-
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी Amazon MX Player वर ५ भाग स्ट्रीम केले गेले आहेत. प्रकाश झा यांच्या या वेब शोची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
-
दरम्यान आश्रमशिवाय आता बॉबी आणखीही धमाकेदार आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. चला याचबद्दल जाणून घेऊयात.
-
Hari Hara Veera Mallu
या चित्रपटात बॉबी देओल एका क्रूर मुघल सम्राटाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होईल. -
Jana Nayagan
बॉबी देओल साऊथ सुपरस्टार विजयच्या शेवटच्या ‘जानायागन’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटानंतर विजयने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. -
Alpha
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अल्फा या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्सचा हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे. -
Housefull 5
मिड डेच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या भागात दिसलेले अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम आणि बॉबी देओल यांना चित्रपटात पुन्हा समाविष्ट केले जाऊ शकते. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. -
(सर्व फोटो साभार- बॉबी देओल इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल