-
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला टेलिव्हिजनवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या सोहळ्यात दरवर्षी नव्याने सुरू होणाऱ्या मालिकांची घोषणा केली जाते.
-
तसेच आगामी काळात सुरू होणाऱ्या नव्या मालिकांमधील कलाकार या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करताना दिसतात.
-
या सोहळ्यात यंदा एका खास अभिनेत्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिचं नाव आहे सायली संजीव.
-
सायली संजीव आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर कमबॅक करणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत सायलीने ती लवकरच मालिकेत काम करणार असल्याचं सांगितलं होतं.
-
सायलीसह या मालिकेत ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरे झळकणार आहे.
-
सायली आणि चेतन या पुरस्कार सोहळ्यात रोमँटिक गाण्यावर एकत्र थिरकत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावरून सायली आणि चेतन या दोघांची एक नवीन मालिका ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर येणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
-
सायली आणि चेतन यांच्या नव्या मालिकेबद्दलची माहिती प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ( १६ मार्च ) मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी, सायली संजीव इन्स्टाग्राम )

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल