-
‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर(Jahnavi Killekar)ने टास्क क्वीन अशी स्वत:ची ओळख निर्माण केली.
-
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने एका मुलाखतीत तिचा महिन्याचा खर्च किती असतो, तसेच ती त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करते, याबद्दल वक्तव्य केले आहे. नुकतीच अभिनेत्रीने ‘सुमन म्युझिक मराठी’ला मुलाखत दिली.
-
स्कीन केअर रूटिनविषयी बोलताना जान्हवीने म्हटले, “मी त्वचेसाठी काहीच करत नाही. फेसवॉश लावते. मी मॉइश्चरायजरसुद्धा फार कमी लावते. शूटिंग झाल्यानंतर घरी येऊन मी मेकअप काढते.
-
“बेबी ऑइलने टिश्यूचा वापर करून मी चेहरा पुसते. याशिवाय बाकी मी काहीच करत नाही.”
-
या मुलाखतीत तिला विचारले की, तिचा महिन्याचा खर्च किती होतो? यावर बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले, “अजून एक गोष्ट मी सकाळी करते, जी मी चेहऱ्याला लावत नाही. पण, ग्लूटाथिओन (glutathione)चे मी दररोज सेवन करते.
-
“निरोगी त्वचेसाठी किंवा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी ग्लूटाथिओनचे सेवन करते. बाकी मी चेहऱ्याला काही लावत नाही. पण, त्या ग्लूटाथिओनचाच खर्च जास्त आहे. जवळजवळ ३०-३५ हजार महिन्याचा त्वचेसाठी खर्च होतो”, असे अभिनेत्रीने म्हटले.
-
‘अबोली’ या मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले की, “आता सध्या जी मी भूमिका करत आहे ती खूप क्रूर आहे, लाचखोऱ इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे ते करताना मला खूप मजा येतेय.”
-
“सगळ्यांवर अरेरावी करणं, जी मी खऱ्या आयुष्यात करू शकत नाही, ती मी या मालिकेच्या माध्यमातून करतेय”, असे म्हणत अभिनेत्रीने ही भूमिका करताना आनंद मिळत असल्याचे म्हटले आहे.
-
जान्हवी किल्लेकरने याआधी ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. (सर्व फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त