-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. या मालिकेने दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील अंतरा व मल्हाराच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.
-
अभिनेत्री योगिता चव्हाणने अंतरा आणि अभिनेता सौरभ चौघुलने मल्हारची भूमिका साकारली होती.
-
‘जीव माझा गुंतला’ मालिका संपल्यानंतर काही महिन्यांनी अंतरा व मल्हार म्हणजेच योगिता व सौरभ आयुष्यभराचे जोडीदार झाले.
-
गेल्यावर्षी ३ मार्चला योगिता व सौरभचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. अचानक दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
आज योगिता व सौरभच्या लग्नाला एक वर्षपूर्ण झालं आहे. यानिमित्ताने दोघं विदेशात फिरायला गेले आहेत.
-
सौरभ चौघुलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे. सौरभने योगिताबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “सगळ्यासाठी तुझे आभार आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
-
सौरभने योगिताबरोबरचे शेअर केलेले फोटो हे इंडोनेशियातील बालीमधील आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सौरभ व योगिता बालीला फिरायला गेले आहेत.
-
फोटोमध्ये योगिता शेवाळी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तर सौरभ पांढरा शर्ट आणि कार्गोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
या फोटोमध्ये सौरभ योगिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. ( सर्व फोटो सौजन्य – योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले इन्स्टाग्राम )

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल