-
फोर्ब्सने नुकतीच जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. ड्वेन जॉन्सन सलग पाचव्यांदा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला आहे तर रायन रेनॉल्ड्स, केविन हार्ट आणि जेरी सेनफेल्ड सारखे स्टार देखील २०२४ च्या यादीत आहेत. २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत एकाही भारतीय कलाकाराचा समावेश नाही.
-
ड्वेन जॉन्सन [$८८ दशलक्ष (जवळपास १० कोटी डॉलर्स)]: हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉकने २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचा महत्त्वाकांक्षी हॉलिडे चित्रपट, रेड वन, अपयशी ठरला असला तरी, ड्वेन २०२४ मध्ये ८८ दशलक्ष डॉलर्सच्या निव्वळ कमाईसह जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला.
-
रायन रेनॉल्ड्स [$८५ दशलक्ष (जवळपास १० कोटी डॉलर्स): डेडपूल आणि वुल्व्हरिन अभिनेता रायन रेनॉल्ड्स २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला.
-
केविन हार्ट [$८१ दशलक्ष (१०.८ कोटी डॉलर्स)]: केविन हार्टने अनेक प्रकल्प केले ज्यामुळे त्याची २०२४ ची मोठी कमाई झाली.
-
जेरी सेनफेल्ड [$७० दशलक्ष (७ कोटी डॉलर्स)]: ७० वर्षीय जेरी सेनफेल्ड यांना गेल्या वर्षी फोर्ब्सने अब्जाधीश म्हणून घोषित केले होते. २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांना चौथे स्थान मिळाले.
-
ह्यू जॅकमन [$५० दशलक्ष (६.६ कोटी डॉलर्स)]: ह्यू जॅकमनसाठी, डेडपूल आणि वुल्व्हरिन हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात फायदेशीर चित्रपट ठरला.
-
ब्रॅड पिट [$३२ दशलक्ष (४.२ कोटी डॉलर्स)]: या अभिनेत्याला यादीत सहावा क्रमांक मिळाला.
-
जॉर्ज क्लूनी [$३१ दशलक्ष (३.७ कोटी डॉलर्स] अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माते जॉर्ज क्लूनी यांचेही नाव या यादीत आहे. स्पाय कॉमेडी वुल्फ्ससाठी त्यांना आणि ब्रॅड पिटला प्रत्येकी $३५ दशलक्ष देण्यात आले होते हे जाहीरपणे नाकारल्यानंतर ते चर्चेत आले होते.
-
निकोल किडमन [$३१ दशलक्ष (४.१ कोटी डॉलर्स)] : ५७ वर्षीय निकोल किडमन २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारी महिला अभिनेत्री आहे.
-
अॅडम सँडलर [$२६ दशलक्ष (३.५ कोटी डॉलर्स)] आगामी हॅपी गिलमोर २ किंवा २०२४ च्या स्पेसमन सारख्या कमी किमतीच्या व्यावसायिक प्रकल्पांचा भाग असलेला अॅडम सँडलर २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नववा क्रमांक पटकावला.
-
विल स्मिथ [$२६ दशलक्ष (३ कोटी डॉलर्स)] ५६ वर्षीय ऑस्कर विजेता दहाव्या क्रमांकावर आहे.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल