-
‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड सध्या वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे.
-
गेल्यावर्षी १४ डिसेंबरला किरण गायकवाडचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्न झालं.
-
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरण लग्नबंधनात अडकला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर किरणची पत्नी वैष्णवीसह परदेशवारी सुरू आहे.
-
किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर इंडोनेशियामध्ये गेले आहेत.
-
इंडोनेशियातील बालीमध्ये किरण पत्नीसह एन्जॉय करत आहे.
-
किरणने इन्स्टाग्राम स्टोरीवर बाली सफरमधील बरेच फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये किरण गायकवाड झोका घेताना दिसत आहे.
-
तसंच या फोटोमध्ये तेगेनुंगन धबधब्यात आनंद लुटताना किरण पाहायला मिळत आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – किरण गायकवाड इन्स्टाग्राम

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल