-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच अभिनेता हृषिकेश शेलार, लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर हे कलाकारही इतर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत.
-
अक्षरा ही शाळेतील शिक्षिका असून, तिचे अशिक्षित असलेल्या अधिपतीबरोबर लग्न झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले.
-
मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेला दहावी व बारावीला किती मार्क्स होते माहीत आहे का?
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि तिचा पती व अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी सर्व काही या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती.
-
यावेळी विराजस व शिवानीला एकमेकांबद्दल काही सलग प्रश्न विचारण्यात आले. यावेळी विराजसला शिवानीचे दहावी-बारावीचे गुण विचारण्यात आले. त्यावर विराजसने माहीत नसल्याचे सांगितले.
-
शिवानीने यावर बोलताना म्हटले , “मला दहावीला ९४ टक्के होते; पण बारावीला माझी मालिका चालू होती. मी प्रवासात वगैरे अभ्यास केला. मी आर्ट्सला होते. मला ७२ टक्के वगैरे असे मार्क्स होते.”
-
पुढे शिवानीने म्हटले, “आई शिक्षिका असून तिने मला स्पष्ट सांगितलेले की, स्पर्धा वगैरे करतेस ते सगळं ठीक आहे. पण, अभ्यास झालाच पाहिजे.”
-
विराजसनेदेखील तिचे पाठांतर चांगले असल्याचे म्हणत शिवानीचे कौतुक केले. (सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम)

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार