-
ऐश्वर्या रायला भारतातील सर्वात सुंदर महिला म्हटले जाते.
-
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिचाही समावेश आहे आणि रिपोर्ट्सनुसार ती ७७६ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.
-
मात्र, आज आपण ऐश्वर्या रायच्या पाकिस्तानी डुप्लिकेटबद्दल माहिती घेणार आहोत.
-
खरं तर, आपण ज्या पाकिस्तानी व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचे नाव कंवल चीमा आहे, जी एक बिझनेस वुमन आहे.
-
कंवल चीमाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि लोक म्हणतात की ती हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसते.
-
त्याचवेळी तिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली दिसत आहे.
-
या व्हिडिओमध्ये ती ऐश्वर्यासारखी दिसत आहे. कंवलचे डोळे ऐश्वर्यासारखे आहेत आणि तिच्या चेहऱ्याची रचनाही अभिनेत्रीशी जुळते.
-
कंवल चीमा ही पाकिस्तानी वंशाची ऑस्ट्रेलियन व्यावसायिक महिला आहे, जी माय इम्पॅक्ट मीटर नावाच्या कंपनीची संस्थापक आहे.
-
माय इम्पॅक्ट मीटर ही संस्था एक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील लोकांना जोडते जे गरजू लोकांना मदत करतात.
-
कंवल चीमा यांच्या या संस्थेद्वारे जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
-
दरम्यान, कंवल चीमा याआधी २०० बिलियन डॉलर्सच्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करायची, पण तिने नोकरी सोडून स्वतःचे हे काम सुरू केले.
Indian Student : भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या; वडिलांची मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया, “चार महिन्यांतच…”