-
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला नुकतंच ‘झी चित्र गौरव २०२५’ सोहळ्यात गौरविण्यात आलं. एक-दोन नव्हे तर ‘फुलवंती’ चित्रपटाला तब्बल सहा पुरस्कार मिळाले.
-
द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इअर – प्राजक्ता माळी, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – महेश लिमये, सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माढे, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – उमेश जाधव, सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा – महेश बराटे हे सहा पुरस्कार ‘फुलवंती’ चित्रपटाला मिळाले आहेत.
-
‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्यात प्राजक्ताने तिच्या स्वप्नातल्या हिरोबद्दल सांगितलं.
-
‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्यात अमेय वाघने प्राजक्ताला स्वप्नातल्या हिरोबाबत विचारलं.
-
अमेयने विचारलं की, प्राजक्ता तुझ्या स्वप्नातला हिरो कसा आहे? काय वाटतं? चहा पिणारा की कॉफी पिणारा? यावर प्राजक्ता म्हणाली, “चहा पिणारा.” अमेयने विचारलं, “का?” तर प्राजक्ता म्हणाली, “मला चहा छान बनवता येतो आणि मला प्यायलाही आवडतो. तर घरात तेच बनेल.”
-
त्यानंतर अमेयने विचारलं, “दाढी की क्लिन शेव?” प्राजक्ता दाढी असं म्हणाली. तेव्हा अमेय म्हणाला, “का?” त्यावर प्राजक्ता म्हणाली, “छान दिसते. मराठी माणसाला मिशी आणि दाढी पाहिजे.”
-
पुढे अमेयने विचारलं, “समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन जाणारा की डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा?” प्राजक्ता माळी म्हणाली की, डोंगरावर. अमेयने विचारलं, “समुद्र किनाऱ्यावर का नाही?” तर प्राजक्ता म्हणाली की, डोंगरावर प्रेम फुलेलं. समुद्र किनारी जरा उथळ फ्लटिंग होईल. हे ऐकताच अमेय वाघ म्हणतो, “म्हणजे जे कोकणात, गोव्यात राहतात ते उथळ फ्लटिंग करतात?” प्राजक्ता म्हणाली, “नाही. त्याने मला डोंगरावर घेवून जाव मग.”
-
“ज्याला तुझा हिरो व्हायचं आहे, त्याने फक्त प्रवास करत राहावा, असं तुला म्हणायचं आहे?” यावर प्राजक्ता माळी, “नाही. मला घेऊन फिरायला जावं डोंगर माथ्यावर.”
-
शेवटी अमेयने विचारलं, “तुझ्यावर कविता करणार की तुझ्या कविता ऐकणारा?” प्राजक्ता म्हणाली की, कविता ऐकणारा.
-
मग अमेय म्हणतो, “मग मला असं वाटतं, जो कोण आहे. ज्याने तुझ्या कविता ऐकल्या पाहिजे, त्याच्यासाठी एक कविता होऊन जाऊ दे.” त्यानंतर प्राजक्ता प्रेम म्हणजे प्रेम असतं कविता ऐकवते.
-
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा अलीकडेच ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.
-
प्राजक्ताच्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्राजक्तासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात असे बरेच तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स