-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
या मालिकेत शरयू सोनावणे ( पारू ) आणि प्रसाद जवादे ( आदित्य ) यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
-
सध्या या मालिकेत पारू विरुद्ध अनुष्का-दिशा असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
पण, आता लवकरच अहिल्यादेवी किर्लोस्करांसमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड होणार आहे.
-
आता पारू लवकरच आदित्यच्या जीवाचं रक्षण करून अहिल्यासमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड करेल.
-
परिणामी, कथानकानुसार अनुष्का हे पात्र ‘पारू’ मालिकेतून एक्झिट घेईल. याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
-
अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने ‘पारू’ मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्यावर “One Last Time” असं कॅप्शन दिलं आहे. या स्क्रिप्टवर “तुझा शेवटचा दिवस अनुष्का” असं लिहिण्यात आलेलं आहे.
-
श्वेता खरातच्या पोस्टमुळे लवकरच अनुष्का हे पात्र या मालिकेतून एक्झिट घेईल हे स्पष्ट होत आहे.
-
दरम्यान, अनुष्का या पात्राच्या एक्झिटनंतर दिशाचं मालिकेत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/ श्वेता खरात इन्स्टाग्राम )
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”