-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
-
निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ, विचारी, मार्मिक प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित आणि निरूत्तर करणारी इंदू घराघरात पोहोचली आहे. या चिमुकल्या इंदूने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
-
बालकलाकार सांची भोईरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने छोट्या इंदूची भूमिका साकारली आहे.
-
आता लवकरच मोठी इंदू प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पिरतीचा वनता उरी पेटला’मध्ये झळकलेली अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत झळकणार आहे.
-
तर गोपाळच्या भूमिकेत चिन्मय पटवर्धन आणि अधू निशांत पवार असणार आहे.
-
१० मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता मोठ्या इंद्रायणीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे.
-
कांची शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कांचीने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत चमकी ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती.
-
कांची सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती लावणी वर्कशॉप घेते. कांचीने अनेक लावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या लावणी आणि अदांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता कांचीने साकारलेली इंद्रायणी प्रेक्षकांची मनं जिंकते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य – कलर्स मराठी )
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”