-
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेमकहाणी चित्रपटसृष्टीतमध्ये सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेली आहे. सर्वांना माहिती आहे की बोनी कपूर यांचे पहिले लग्न अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांची आई मोना शौरी कपूरशी झाले होते. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
बोनी कपूर यांचे दुसरे लग्न चित्रपटसृष्टीतील स्टार आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत झाले होते. पण जेव्हा त्यांनी श्रीदेवी यांना प्रपोज केलेले तेव्हा त्यांना काय उत्तर मिळाले हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
बोनी यांच्या प्रपोजनंतर श्रीदेवी सहा महिने त्यांच्याशी बोलल्या नाहीत. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
जेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना प्रपोज केले तेव्हा ते मोना शौरी कपूर आणि त्यांची दोन मुले अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांच्याबरोबर राहत होते. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
जेव्हा बोनी कपूर यांनी पहिल्यांदा श्रीदेवीवर प्रेम व्यक्त केले तेव्हा अभिनेत्री आश्चर्यचकित झाली आणि काही दिवस त्यांच्यापासून दूर राहिली. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
दरम्यान, हा खुलासा स्वतः बोनी कपूर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या त्यांच्या जुन्या मुलाखतीत केलेला आहे. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
बोनी कपूर यांनी या मुलाखतीत असेही सांगितले होते की, श्रीदेवीला प्रपोज करणार असल्याची गोष्ट त्यांनी पहिल्या पत्नी मोना कपूर यांनाही सांगितली होती. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
त्यांच्या मते, “प्रेम कधीच परिपूर्ण नसते आणि कधीकधी भावना एखाद्याच्या नियंत्रणाबाहेर जातात”. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
श्रीदेवी यांच्यावरील प्रेम पटवून देण्यासाठी बोनी कपूर यांना पाच ते सहा वर्षे लागली. जेव्हा त्यांनी अभिनेत्रीला प्रपोज केले तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, ‘तू विवाहित आहेस आणि तुला दोन मुले आहेत, तू मला हे असे कसे बोलू शकतोस’? (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
यानंतर, श्रीदेवी सहा महिने बोनी कपूर यांच्याशी बोलल्या नाहीत. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
त्यावेळी श्रीदेवी यांनी तात्काळ बोनी कपूर यांना उत्तर देणे योग्य मानले नाही. म्हणूनच त्यांना इतके महिने लागले. तथापि, नंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले आणि त्यानंतर त्यांनी १९९६ मध्ये लग्न केले. (Photo: Sridevi Kapoor/Insta)
-
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. आज श्रीदेवी या जगात नसल्या तरी जान्हवी कपूर, खुशी कपूर, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांच्यात खूप चांगले भावंडांचे नाते आहे. (Photo: Sridevi Kapoor/Insta)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा