-
अभिनेत्री अलाया एफ तिच्या सोशल मीडियावर हेल्थ व ब्युटी टिप्स शेअर करत असते. योग, व्यायाम, स्किनकेअर हॅक्सपासून ते डिटॉक्सपर्यंत, बॉलीवूड अभिनेत्री व्हायरल ट्रेंडबद्दल तिची मतं व्यक्त करत असते. अलीकडेच, तिने रबर बँड वापरून व्हायरल कोरियन डी-पफिंग टेक्निक वापरून पाहतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@alayaf)
-
“जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही फक्त दोन रबर बँड वापरून फक्त १० मिनिटांत घरी बसून तुमचा चेहरा कोरू शकता तर?” असं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले. (स्रोत: Instagram/@alayaf)
-
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास तिला या कोरियन डी-फफिंग हॅकचा अनुभव घेतला आला. तेव्हापासून ते अनेक वेळा वापरून पाहिल्याचं तिने नमूद केलं. “मला वाटते की ते काम करते!” असं ती म्हणाली. (स्रोत: Instagram/@alayaf)
-
बोर्ड-प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञ आणि दिल्लीतील हाऊस ऑफ एस्थेटिक्सच्या संस्थापक डॉ. नेहा खुराना यांनी सांगितलं की, १० मिनिटांचे डिपफ रूटीन प्रभावी ठरू शकते. यामुळे चेहऱ्यावरील सूज येण्याचे मुख्य कारण असलेले अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत होते. (स्रोत: Instagram/@alayaf)
-
गुडगाव येथील बॉडीक्राफ्ट क्लिनिकच्या वैद्यकीय संचालक डॉ. मिक्की सिंग यांनी इशारा दिला की या पद्धतीमुळे अस्वस्थ वाटू शकतं. यामुळे रक्ताभिसरण होण्यास मर्यादा येतात. तसेच कानांभोवती जळजळ देखील होऊ शकते. चेहऱ्यावरील पफीनेस कमी करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी आइस रोलर्स किंवा लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज हे वापरू शकता. (स्रोत: Instagram/@alayaf)
-
त्याचे परिणाम तात्पुरते असतील कारण हा दीर्घकालीन उपाय नाही. सर्व व्यक्तींसाठी या रुटीनची खात्री करण्यासाठी कोणताही मजबूत वैज्ञानिक पुरावा नाही, असे दोघांनीही सांगितले. (स्रोत: Instagram/@alayaf)

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”