-
सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. (PC : Still from film/Jansatta)
-
चित्रपटातील गाणी आणि टीझरने आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘सिकंदर’ हा चित्रपट २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. (PC : Still from film/Jansatta)
-
हा चित्रपट २८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या भूमिकांसाठी किती पैसे मिळाले? (PC : Still from film/Jansatta)
-
सलमान खान
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सलमान खानला १२० कोटी रुपये इतकं मानधन मिळालं आहे. यामध्ये त्याचं मानधन आणि नफ्यातील वाटा या दोन्ही गोष्टींचा समावेश असू शकतो (PC : @beingsalmankhan/insta) -
रश्मिका मंदान्ना
‘पुष्पा २’ आणि ‘छावा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करणारी सिकंदरमधील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला ५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. (PC : @rashmika_mandanna/insta) -
काजल अग्रवाल
या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या काजल अग्रवालला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. (PC : @kajalaggarwalofficial/insta) -
शर्मन जोशी
शर्मन जोशीला त्याच्या भूमिकेसाठी ७५ लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. (PC : @sharmanjoshi/insta) -
प्रतीक बब्बर
या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक बब्बरने ६० लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (PC : @_prat/insta) -
सत्यराज
‘बाहुबली’मध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते सत्यराज यांना ५० लाख रुपये मानधन मिळाले आहे. (PC : Jansatta) -
नवाब शाह
या चित्रपटात नवाब शाह देखील दिसणार आहे, त्याने ३० लाख रुपये मानधान घेतलं आहे. (PC: @nawwabshah/insta) -
हा चित्रपट भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या एका मुलाची कथा आहे. तो सत्ता आणि व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी लढतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादॉस यांनी केले आहे. साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची केली आहे. (PC : Still from film/Jansatta)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल