-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध व सुपरहिट ठरलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं.
-
करिअरच्या शिखरावर असताना मृणाल लग्नबंधनात अडकली. त्यानंतर काही वर्षे मालिकाविश्वात काम करून मृणाल २०२० मध्ये अमेरिकेत राहायला गेली.
-
मृणाल गेल्यावर्षी आपल्या कुटुंबीयांसह ४ वर्षांनी भारतात परतली.
-
भारतात परतल्यावर पुढे काही महिन्यांमध्ये अभिनेत्रीने ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस ‘नंदिनी’ ही भूमिका साकारत आहे.
-
अपेक्षेप्रमाणे मृणालच्या या मालिकेला प्रेक्षक पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद देत आहेत.
-
याची पोचपावती म्हणून यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात मृणालने दोन महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत.
-
‘सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य- स्त्री’ आणि ‘सर्वोत्कृष्ट भावंडं’ या दोन पुरस्कारांवर मृणाल दुसानिसने आपलं नाव कोरलं आहे.
-
याशिवाय यंदाचा पुरस्कार सोहळा मृणालने अभिजीत आमकरच्या साथीने होस्ट देखील केला. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह व मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम )

नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम