-
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. यांच्या मुलाचं नाव अमेय आहे.
-
अमेय सध्या परदेशात त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करत आहे. ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अभिनेत्री ईशा संजयला गेल्या काही वर्षांपासून अमेय डेट करत आहे. ईशाने स्वत: फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
-
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लेक अमेयप्रमाणे त्याची गर्लफ्रेंड ईशा संजय देखील तेवढीच सुंदर दिसते.
-
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत ईशा संजय सूर्या दादाच्या चार बहिणींपैकी एक राजश्रीची भूमिका साकारत आहे. तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणतात.
-
ईशाने तिच्या सोशल मीडियावर अमेय नारकरबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यामध्ये एका नेटकऱ्याने तिला लग्नासंदर्भात प्रश्न विचारला.
-
ईशाला नेटकऱ्याने, “तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर वाचून दोघंही लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहेत हे स्पष्ट होत आहे.
-
ईशाने या नेटकऱ्याला, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं आहे. याशिवाय या पोस्टमध्ये ईशाने अमेयला टॅग सुद्धा केलं आहे.
-
अमेय व ईशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मध्यंतरी या दोघांचा एकत्र डान्स करताना व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. ( सर्व फोटो सौजन्य : ईशा संजय इन्स्टाग्राम )
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही