-
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने एक डेटा जारी केला आहे, ज्यात या आठवड्यात कोणते १० चित्रपट सर्वात जास्त पाहिले गेले याची माहिती आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत १० व्या क्रमांकावर असलेला चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स)
-
१- थंडेल
नागा चैतन्य आणि साई पल्लवी अभिनीत हा तेलुगू चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या ‘थंडेल’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
२- नादानियां
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर दुसरा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ‘नादानियां’ आहे. या रोमँटिक चित्रपटात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
३. इमर्जन्सी
या वर्षी १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला कंगना राणौत स्टारर इमर्जन्सी तिसऱ्या स्थानावर आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
४- विदा मुयारची
दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार यांचा तमिळ चित्रपट ‘विदामुयार्च्यी’ या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला चौथा चित्रपट आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) बोनी कपूरच्या प्रस्तावाला श्रीदेवीने दिलेले हे उत्तर होते; तिला पटवून देण्यासाठी त्यांना इतकी वर्षे लागली का? -
५-आझाद
अजय देवगण आणि डायना पेंटी स्टारर ‘आझाद’ हा चित्रपट यावर्षी १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट थिएटरमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही पण लोकांना तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर खूप आवडतोय. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
६- धूम धाम
रोमँटिक, अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट ‘धूम धाम’ या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
७- डाकू महाराज
डाकू महाराज हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये साऊथ स्टार नंदमुरी बालकृष्ण, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही खूप गाजत आहे आणि भारतात या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेला ७ वा चित्रपट आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
८- पुष्पा २: द रुल (रीलोडेड व्हर्जन)
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फाझिल आणि जगपती बाबू स्टारर ‘पुष्पा २: द रुल’ हा या आठवड्यात नेटफ्लिक्सवर आठवा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
९-द इलेक्ट्रिक स्टेट
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत अमेरिकन सायन्स फिक्शन अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘द इलेक्ट्रिक स्टेट’ ९व्या क्रमांकावर आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
१०- लकी भास्कर
‘लकी भास्कर’ गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. फक्त ५६ कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे १११ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स)
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक