-
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट आज (२१ मार्च) पुन्हा प्रदर्शित झाला.
-
९ वर्षांपूर्वी (9 Years Of Sairat) २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ हा चित्रपट (SuperHit Marathi Movie) प्रदर्शित झाला होता.
-
‘सैराट’ चित्रपटातील आर्ची (Archie) आणि परश्याच्या (Parshya) जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता.
-
पहिल्याच चित्रपटात या दोन नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची भूरळ पाडली होती.
-
या चित्रपटातले प्रत्येक गाणं आणि संवाद (Sairat Song And Dialogues) सुपरहिट ठरले होते.
-
या चित्रपटामुळे परश्याची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) व आर्चीच्या भूमिकेतील अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे रातोरात प्रसिद्ध झाले.
-
आकाश इन्स्टाग्रामवर ‘सैराट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे (Shooting BTS Photos) खास फोटो शेअर केले आहेत.
-
९ वर्षांनंतरही प्रेक्षकांना या चित्रपटाने लावलेले याडं किंचितही कमी झालेले नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकाश ठोसरे/इन्स्टाग्राम)

२२ मार्च पंचांग: इच्छापूर्ती ते ताण-तणाव होतील दूर! शीतला अष्टमीला कोणत्या राशीचे नशीब सोन्यासारखे चमकणार? वाचा राशिभविष्य