-
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या आठवड्यात कोणते १० चित्रपट सर्वात जास्त पाहिले गेले याचा डेटा जारी केला आहे. या यादीत १० व्या क्रमांकावर असलेला हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत आहे.
-
थंडेल: नागा चैतन्य आणि साई पल्लवी अभिनीत हा तेलुगू चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘थंडेल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
-
नादानियां : या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला दुसरा चित्रपट ‘नादानियान’ आहे. या रोमँटिक चित्रपटात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
-
इमर्जन्सी: या वर्षी १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे.
-
विदामुयार्ची: साऊथ स्टार अजित कुमार अभिनीत तमिळ चित्रपट विदामुयार्ची या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला चौथा चित्रपट आहे.
-
आझाद : अजय देवगण आणि डायना पेंटी स्टारर ‘आझाद’ हा चित्रपट या वर्षी १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई केलेली नाही, परंतु लोकांना तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर खूप आवडतोय.
-
धूम धाम: रोमँटिक, अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट ‘धूम धाम’ या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
‘डाकू: महाराज’ हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही खूप गाजत आहे आणि या आठवड्यात भारतात सर्वाधिक पाहिलेला ७ वा चित्रपट आहे.
-
पुष्पा २ : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फाझिल आणि जगपती बाबू अभिनीत ‘पुष्पा २: द रुल’ हा या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला आठवा चित्रपट आहे.
-
द इलेक्ट्रिक स्टेट: अमेरिकन सायन्स फिक्शन अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट द इलेक्ट्रिक स्टेट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे.
-
लकी भास्कर : लकी भास्कर गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. फक्त ५६ कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे १११ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो सर्वाधिक पाहिलेल्या पहिल्या १० चित्रपटांच्या यादीत राहिला आहे.

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही