-
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे १४ जून २०२० रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले. त्याने वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतू, ज्या परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणात, कुटुंबाला हत्येचा संशय होता आणि त्यानंतर अभिनेत्याची माजी प्रेयसी रिया चक्रवर्ती देखील संशयाच्या भोवऱ्यात होती. (Photo: Social Media)
-
अनेक वर्षे चाललेल्या या प्रकरणात, आता २२ मार्च २०२५ रोजी सीबीआयने आपला क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की अभिनेत्याच्या मृत्यूमागे कट रचल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि म्हणून हा खटला बंद करण्यात आला आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट देण्यात आली आहे. (Photo: Social Media)
-
दरम्यान, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सुनावणी आता २ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. या प्रकरणात, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी त्यांच्या वकिलामार्फत एका रिट याचिकेवर सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती. (Photo: Social Media)
-
यासंबंधी माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे या प्रकरणात अनेक पुरावे आहेत, जे ते सुनावणीदरम्यान सादर करू शकतात. (Photo: Social Media)
-
या यादीत ९० च्या दशकातील अभिनेत्री दिव्या भारतीचेही नाव आहे. तिचे निधन ५ एप्रिल १९९३ या दिवशी झाले. घराच्या बाल्कनीतून घसरून पडल्याने या अभिनेत्रीचा मृत्यू झाला. ती तिच्या पाचव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत बसली होती आणि त्यानंतर तिचा पाय घसरला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. (Photo: Social Media)
-
त्यावेळी तिच्या घरी तिची मैत्रीण नीता लुला, तिचा नवरा श्याम लुला आणि घरी काम करणारी महिला अमृता कुमारी उपस्थित होते. दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, बाल्कनीतून पडल्यानंतर डोक्याला दुखापत आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या कारणास्तव तिची फाईल बंद करण्यात आली आणि तिच्या मृत्यूच्या घटनेला अपघात घोषित करण्यात आले. (Photo: Social Media)
-
अभिनेत्री जिया खानचे जून २०१३ मध्ये निधन झाले. तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीने ६ पानांची सुसाईड नोट मागे सोडली होती. (Photo: Social Media)
-
त्यात तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पंचोलीचा उल्लेख होता कारण ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. (Photo: Social Media)
-
या पत्रात जियाने अनेक आरोप केले होते. दरम्यान, अनेक वर्षे चाललेला हा खटला पुराव्यांअभावी २०२३ मध्ये बंद करण्यात आला आणि सूरज पंचोलीवरील आरोप मागे घेण्यात आले. (Photo: Social Media) हेही पाहा- Photos : गुलाबी साडीमध्ये तमन्ना भाटियाचं फोटोशूट, सोज्वळ लूकवर चाहते घायाळ…

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल