-
आयपीएल २०२५ मधील पहिले शतक हैदराबाद सनरायझर्सच्या इशान किशनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले. इशान किशनने हे शतक फक्त ४५ चेंडूत पूर्ण केले. (Photo: PTI)
-
इशान किशन १०६ धावा करून नाबाद राहिला. यासोबतच, त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला. (Photo: PTI)
-
इशान किशन जितका चांगला खेळाडू आहे तितकेच त्याचे छंदही महागडे आहेत. त्याच्याकडे कोणत्या मौल्यवान गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात… (Photo: Ishan Kishan/Insta)
-
महागड्या गाड्या
ईशान किशनला महागड्या गाड्या खूप आवडतात. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स सीरीजची कार आहे जीची किंमत ६५.४० लाख ते ६८.९० लाख रुपयांदरम्यान आहे. (Photo: Ishan Kishan/Insta) -
याशिवाय, इशान किशनकडे फोर्ड मस्टँग जीटी कार आहे जी ७१.७२ लाख रुपयांची आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)
-
इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ सी-क्लास सारख्या लक्झरी कारचाही समावेश आहे. तिची किंमत ६० लाख ते ६६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)
-
स्नीकर्सची आवड.
इशान किशनला महागडे स्नीकर्स देखील खूप आवडतात. एकदा त्याने नाईक एअर जॉर्डन स्नीकर्स घातले होते ते ५० हजार रुपये किंमतीचे होते, असे म्हटले जाते. (Photo: Ishan Kishan/Insta) -
२३ लाखांचे घड्याळ
या सर्वांव्यतिरिक्त, किशनला महागड्या घड्याळांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे रोलेक्स डे डेट घड्याळ आहे ज्याची किंमत २३,७८,५०० रुपये आहे. (Photo: Ishan Kishan/Insta) -
या घड्याळाची किंमत ५० लाखांपेक्षा जास्त आहे.
यासोबतच त्याच्याकडे फ्रँक मुलरचे घड्याळ देखील आहे ज्याची किंमत ५१,७७,३०० रुपये आहे. (Photo: Ishan Kishan/Insta) हेही पाहा- आयपीएलचे चाहते आहात? तर मग क्रिकेटप्रेमींनो ‘हे’ ८ बॉलीवूड चित्रपट अजिबात चुकवू नका

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य