-
दर महिन्याच्या शेवटी, नेटफ्लिक्स, हुलू, मॅक्स आणि टुबी सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या कॅटलॉगमधून अनेक चित्रपट काढून टाकतात. पण सर्वाघिक सिनेमे Amazon Prime वरून काढले जातात, प्राईमवर दरमहा १०० हून अधिक चित्रपट काढून टाकले जातात. यातील बरेच चित्रपट क्लासिक आहेत आणि मार्च महिनाही त्याला अपवाद नाही. जर तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चित्रपटांपैकी कोणते चित्रपट पाहायचे असा प्रश्न पडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी १० सर्वोत्तम चित्रपटांची यादी तयार केली आहे, जे ३१ मार्चनंतर Amazon Prime Video वरून काढून टाकले जातील. (Stills From Film)
-
A Fish Called Wanda (1988)
हा ब्रिटिश-अमेरिकन विनोदी चित्रपट एक चोरी आणि त्यानंतर घडणाऱ्या मजेदार घटनांवर आधारित आहे. केविन क्लाइन, जेमी ली कर्टिस आणि मायकेल पॅलिन यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा विनोदी चित्रपट क्लासिक बनला आहे. (Still From Film) -
Blue Valentine (2011)
हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि त्यांच्या चढ-उतारांबद्दल सखोल माहिती देतो. रायन गोस्लिंग आणि मिशेल विल्यम्स यांच्या दमदार अभिनयासह, हा चित्रपट प्रेमकथा आणि ब्रेकअपमधील गुंतागुंतीचा कुशलतेने शोध घेतो. (Still From Film) -
Blue Velvet (1986)
डेव्हिड लिंचच्या या क्लासिक चित्रपटात एका छोट्या शहराची काळोखी आणि रहस्यमय बाजू उलगडली आहे. चित्रपटातील मुख्य पात्र, जेफ्री ब्यूमोंट (काइल मॅकलॉचलन), त्याला कापलेला कान सापडल्यानंतर त्याच्या शहरातील लपलेले रहस्य उलगडतो. हा चित्रपट रहस्य, सस्पेन्स आणि डार्क ड्रामाचा परिपूर्ण संगम आहे. (Still From Film) -
Bohemian Rhapsody (2018)
हा सिनेमा क्वीन बँडच्या प्रसिद्ध गायक फ्रेडी मर्क्युरीचा बायोपिक आहे, यातील अभिनेता रामी मलेकला ऑस्कर मिळाला. या चित्रपटात क्वीन बँडची यशोगाथा आणि फ्रेडी मर्क्युरीच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. (Still From Film) -
Buffalo ’66 (1998)
विन्सेंट गॅलो दिग्दर्शित हा चित्रपट एक अनोखी प्रेमकथा आहे. चित्रपटात तुरुंगातून सुटलेल्या एका तरुणाची कथा आहे, जो एका मुलीचे अपहरण करतो आणि आपल्या पालकांना प्रभावित करण्यासाठी तिला पत्नी म्हणून सादर करतो. चित्रपटाची असामान्य कथा त्याला खास बनवते. (Still From Film) -
Escape from New York (1981)
एका गुन्हेगारी जगाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट एक जबरदस्त अॅक्शन-थ्रिलर आहे. यामध्ये कर्ट रसेल ‘स्नेक प्लिस्किन’ची भूमिका साकारली आहे, जो राष्ट्रपतींना वाचवण्याच्या मोहिमेवर असतो. जॉन कारपेंटरचा हा चित्रपट विज्ञान-कथा आणि अॅक्शन प्रेमींसाठी एक उत्तम अनुभव आहे. (Still From Film) -
Red River (1948)
हा क्लासिक पाश्चात्य चित्रपट सत्ता आणि हुकूमशाहीच्या थीमवर आधारित आहे. यामध्ये, जॉन वेन एका कणखर आणि खडतर काउबॉयची भूमिका करतो जो त्याच्या मुलासोबत एका कठीण प्रवासाला निघतो. हा चित्रपट पाश्चात्य चित्रपटाचे एक उत्तम उदाहरण आहे. (Still From Film) -
The Bridges of Madison County (1995)
क्लिंट ईस्टवुड आणि मेरिल स्ट्रीप अभिनीत हा रोमँटिक ड्रामा चित्रपट प्रेम आणि त्यागाची एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. १९६५ मध्ये घडणारा हा चित्रपट एका छायाचित्रकार आणि गृहिणीमधील चार दिवसांच्या घनिष्ठ नात्यावर आधारित आहे जो त्यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकतो. (Still From Film) -
The Lords of Salem (2013)
हॉरर चित्रपट प्रेमींसाठी, हा रॉब झोम्बी चित्रपट एक उत्तम अनुभव आहे. हा चित्रपट एका रेडिओ जॉकीभोवती फिरतो ज्याला एक रहस्यमय रेकॉर्ड सापडतो, ज्यामुळे भयानक घटनांची मालिका सुरू होते. (Still From Film) -
The Royal Tenenbaums (2001)
वेस अँडरसन दिग्दर्शित हा चित्रपट एक विचित्र पण हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा आहे. चित्रपटात एका असाधारण पण तुटलेल्या कुटुंबाची कहाणी आहे जिथे एक वडील आपल्या मुलांशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. बेन स्टिलर, ग्वेनेथ पॅल्ट्रो आणि जीन हॅकमन यांचा उत्कृष्ट अभिनय या चित्रपटाला खास बनवतो. (Still From Film) हेही पाहा- KKR व्यतिरिक्त शाहरुख खान ‘या’ तीन क्रिकेट संघांचा मालक आहे…

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल