-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे. (Photo: Kunal Kamra/FB)
-
यावर कुणाल कामरा म्हणाला की तो माफी मागणार नाही. (Photo: Kunal Kamra/FB)
-
कुणाल कामराने ट्विट केले की, ‘मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे.’ (Photo: Kunal Kamra/FB)
-
कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आहे. पण त्याने हे त्याची विनोदाची कारकिर्द कधी सुरू केली हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo: Kunal Kamra/FB)
-
मुंबईत जन्मलेल्या कुणाल कामराने जय हिंद कॉलेजमधून पदवीसाठी प्रवेश घेतला. पण त्याने कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडले. (Photo: Kunal Kamra/FB)
-
शिक्षण सोडल्यानंतर, कुणाल कामराने प्रसून पांडेच्या जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था ‘कॉर्कोइस फिल्म्स’मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (Photo: Kunal Kamra/FB)
-
कुणाल कामराने २०१३ मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लब येथे एका कार्यक्रमाद्वारे स्टैंड-अप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. (Photo: Kunal Kamra/FB)
-
यानंतर, तो हळूहळू सोशल मीडियावर प्रसिद्ध होत गेला आणि आज त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo: Kunal Kamra/FB)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल