-
Netflix Upcoming Movies 2025: OTT प्लॅटफॉर्म Netflix वर या आठवड्यात अनेक खास चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांपासून ते हाय व्होल्टेज सिरीजपर्यंत संपूर्ण यादी पाहूया… (Stills From Film)
-
Million Dollar Secret
नेटफ्लिक्सवर २६ मार्चपासून मिलियन डॉलर सिक्रेट नावाचा शो सुरू होणार आहे, ज्यामध्ये धूर्तपणा आणि फसवणुकीचा खेळ पाहायला मिळणार आहे. (Still From Film) -
Caught
‘कॉच’ २६ मार्चला रिलीज होणार आहे, यामध्ये एम्मा नावाच्या रिपोर्टरची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एम्माच्या आयुष्यात एक असे वळण येते जे तिला तिच्या जवळच्या लोकांबरोबर संघर्ष करायला भाग पाडते. (Still From Film) -
Gold and Greed
जर तुम्हाला काही मनोरंजक पाहायचे असेल तर तुम्हाला २७ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण या दिवशी ‘गोल्ड अँड ग्रीड’ येत आहे, यामधील गोष्ट खजिन्याच्या शोधाची आहे. एक माणूस डोंगरात कुठेतरी सोन्याने भरलेली संदूक लपवतो आणि त्याबद्दलचे सिक्रेट कवितांमधील शब्दांमध्ये गुढपणे लपवतो. (Still From Film) -
Survival of the Thickest
या सिरीजचा दुसरा सीझन २७ मार्चला रिलीज होत आहे. शोचा पहिला सीझन सुपरहिट ठरला होता आणि आता दुसरा सीझन प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येत आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Still From Film) -
The Lady’s Compassion
जेव्हा एलेना नावाच्या मुलीला तीन श्रीमंत बहिणींसाठी पती शोधण्यासाठी नियुक्त केले जाते तेव्हा तिला कोणत्या प्रकारचे चॅलेंज्स आणि कारस्थानांना सामोरे जावे लागते, ही ‘द लेडीज कंपॅशन’ची कथा आहे. हा शो २८ मार्चला रिलीज होणार आहे. (Still From Film) -
The Life List
कौटुंबिक ड्रामा, रोमान्स, सस्पेन्स आणि कॉमेडी… सर्वकाही एकाच ठिकाणी. द लाईफ लिस्ट हा शो २८ मार्च रोजी Netflix वर प्रदर्शित होईल. यातील कथा एका मुलीची आहे जिची आई तिला तिची विशलिस्ट पूर्ण करण्यासाठी जगाच्या प्रवासावर पाठवते. (Still From Film) -
Promised Heart
‘प्रॉमिस्ड हर्ट’ ३१ मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल. (Still From Film) -
Gone girls
‘गॉन गर्ल्स’ ३१ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर देखील उपलब्ध होईल. जेव्हा सेक्स इंडस्ट्रीत काम करणाऱ्या काही मुली अचानक गायब झाल्या होत्या, तेव्हा कोणालाही त्यांचा शोध घ्यावासा वाटला नाही. त्यांचे अवशेष २०१० मध्ये सापडले, जर तुम्हाला वास्तविक जीवनाशी निगडीत काहीतरी हृदय पिळवटून टाकणारे पहायचे असेल तर तुम्ही ही सिरीज नक्की निवडू शकता. (Still From Film) हेही पाहा- सर सीएस नायर कोण होते? ‘केसरी चॅप्टर २’ मध्ये अक्षय कुमारने साकारली त्यांची भूमिका; ब्रिटिशांविरोधात लढला होता खटला
१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार