-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर.
-
सई लवकरच ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर पाहायला मिळणार आहे.
-
नुकताच ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यामध्ये सई ताम्हणकरची झलक पाहायला मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी सईने एका वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
-
काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये सई या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाली. यावेळी सईने कोणत्या तीन व्यक्तींना किडनॅप करावंस वाटतं? याबद्दल सांगितलं.
-
सई ताम्हणकरला हॉलीवूड अभिनेता जेक जिलएनहॉल, अभिनेता आदर्श गौरव आणि मॅनेजर संतुष्टिला किडनॅप करण्याची इच्छा आहे.
-
यामागचं कारण सांगत सई म्हणाली की, या तीन माझ्या आवडत्या व्यक्ती आहेत. माझी मॅनेजर खूप व्यग्र झालीये. त्यामुळे मला तिला किडनॅप करून कुठेतरी घेऊन जायचं आहे.
-
पुढे सईला तिच्या आवडी-निवडीबाबत विचारण्यात आलं. सईला विचारलं की, तुझा आवडता पदार्थ कोणता? तर अभिनेत्री म्हणाली, “पोळी भाजी.”
-
त्यानंतर सईला आवडता अभिनेता व अभिनेत्रीबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “विकी कौशल, प्रियांका चोप्रा.” ( सर्व फोटो सौजन्य – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का