-
‘हम आपके हैं कौन’, ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘मोहब्बत’, ‘दिल तो पागल है’, ‘पुकार’, ‘वजूद’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ते ‘भूल भूलैय्या-३’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी ओळखली जाते. ‘धकधक गर्ल’ म्हणूनही अभिनेत्रीची ओळख आहे.
-
माधुरी दीक्षितचे ‘एक-दो-तीन’ हे गाणेदेखील चांगलेच गाजले होते. आता अभिनेत्रीने हे गाणे कोणती अभिनेत्री रिक्रिएट करू शकते, यावर वक्तव्य केले आहे.
-
आयफा पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर अभिनेत्रीने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. माधुरी म्हणाली, “आताच्या तरुण पिढीमधील मला राशा थडानी खूप आवडते. ती उत्तम डान्स करते.”
-
जेव्हा तिला विचारले की, ‘एक-दो-तीन’ या गाजलेल्या गाण्याला आज कोण न्याय देऊ शकते? तर, त्याचे उत्तर देताना अभिनेत्रीने राशाचे नाव घेतले.
-
१९८८ साली प्रदर्शित झालेल्या तेजाब या चित्रपटातील ‘एक-दो-तीन’ या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. एन.चंद्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. माधुरी दीक्षित व अनिल कपूर हे प्रमुख भूमिकांत दिसले होते.
-
राशा ही रविना टंडनची मुलगी आहे. नुकतेच तिने बॉलीवूडमध्ये डेब्यूट केले आहे. तिचा आझाद हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अजय देवगणही प्रमुख भूमिकेत दिसला होता; मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकला नाही. अभिनेत्रीने ‘उई अम्मा’ या गाण्यातून सर्वांचे लक्ष वेधले होते.
-
माधुरी दीक्षित ‘भूल भुलैय्या ३’मध्येही प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का