-
‘संतोष’ ची कथा काय आहे?
‘संतोष’ ही उत्तर भारतातील एका खेड्यात राहणाऱ्या एका महिलेची कथा आहे. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, तिला पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी मिळते – तीच नोकरी जी तिचा पती पूर्वी करत होता. ही संधी आर्थिक स्थैर्य आणणारी दिसते, परंतु संतोष हळूहळू एका खोल सामाजिक संघर्षात अडकते. (Still From Film) -
पोलीस दलात एक महिला म्हणून, तिला केवळ पुरुषप्रधान व्यवस्थेशी झुंजावे लागत नाही तर खोलवर रुजलेल्या जातीयवाद, पितृसत्ताकता आणि भ्रष्टाचाराचाही सामना करावा लागतो. जेव्हा एका दलित मुलीच्या हत्येचा खटला उघडकीस येतो तेव्हा संतोषला कळते की न्याय मिळवणे सोपे नाही. (Still From Film)
-
ही केवळ गुन्ह्याची उकल करणारी एक कथा नाही, तर ज्या व्यवस्थेमुळे हे गुन्हे घडू शकतात त्या व्यवस्थेत खोलवर जाण्याची गोष्ट आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे हा चित्रपट संतोषला पारंपरिक नायिका बनवत नाही. (Still From Film)
-
संतोष एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे जी कधीकधी अन्यायाविरुद्ध उभी राहते आणि कधीकधी त्याच अन्यायी व्यवस्थेचा भाग बनते. हा चित्रपट आपल्याला या व्यवस्थेत आपण कुठे उभे आहोत याचा विचार करण्यास भाग पाडतो – आपण अन्यायाविरुद्ध लढत आहोत की त्याच्यामागील शांततेचा भाग झालो आहोत? असा प्रश्न उभा करतो. (Still From Film)
-
भारतात बंदी, पण जगात कौतुक
भारतातील सेन्सॉर बोर्डाने संतोषवर “वादग्रस्त” असल्याचे कारण देत बंदी घातली असली तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Un Certain Regard विभागात स्थान मिळवले आहे. या चित्रपटाची यूकेची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून निवडही झाली. (Still From Film) -
बाफ्टा पुरस्कारांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटासाठी नामांकन मिळाले. नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यूने २०२४ च्या टॉप पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये याला स्थान दिले. इतके जागतिक यश असूनही, भारतात त्यावर बंदी घालणे केवळ विरोधाभासीच नाही तर चिंताजनक देखील आहे. (Still From Film)
-
शहाना गोस्वामी यांचा दमदार अभिनय
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शहाना गोस्वामीने संतोषची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने साकारली आहे ती चित्रपटाला आणखी प्रभावी बनवते. त्यांनी हे पात्र संयमी अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. (Still From Film) -
उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हे पात्र अस्वस्थ करणारे आहे – कारण संतोष सतत बरोबर आणि चूक यांच्यामध्ये गुंतलेली राहते, ज्यामुळे ती अधिक वास्तविक बनते. शहाना यांनी स्वतः मत मांडले आहे की सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्सबद्दल त्या सहमत नाहीत. आता त्यांना चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची एकमेव आशा आहे. (Still From Film)
-
संतोषसारखे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे
आज जेव्हा भारतीय समाजात मतभेद दाबले जात आहेत, सत्यकथा विकृत केल्या जात आहेत, तेव्हा संतोषसारखे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे बनतात. हा चित्रपट केवळ गुन्ह्यांची उकल करत नाही, तर कोणत्या प्रकारची व्यवस्था अशा गुन्ह्यांना परवानगी देते हेही दाखवतो. (Still From Film) -
हा चित्रपट पोलिस व्यवस्था, जातीवाद आणि सत्ता केंद्रे प्रत्यक्षात कसे काम करतात हे दाखवतो. एक सामान्य नागरिक देखील कधीकधी अन्यायाविरुद्ध कसा लढू शकतो आणि कधीकधी त्याचाच भाग बनू शकतो, असा आशय हा चित्रपट सांगतो. ब्रिटीश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. (Still From Film)
-
भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपट का थांबवला?
सेन्सॉर बोर्ड ऑफ इंडिया (CBFC) ने संतोषला पास करण्यास नकार दिला. दिलेली कारणे: १. चित्रपट पोलिसांच्या क्रूरतेचे वास्तववादी चित्रण दाखवतो. २. जातीभेद आणि सत्तेचे दमनकारी स्वरूप अधोरेखित करतो. ३. चित्रपट महिला आणि अल्पसंख्याकांविरुद्ध होणारा भेदभाव दाखवतो. (Still From Film) -
बोर्डाने इतके कट सुचवले की चित्रपटाचा संपूर्ण आत्माच नष्ट झाला असता. यामुळे दिग्दर्शिका संध्या सुरी यांना चित्रपट मागे घ्यावा लागला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हाच सेन्सॉर बोर्ड पोलिस कोठडीतील एन्काउंटर दाखवणारे चित्रपट पास करतो. यावरून आपल्याला कोणत्या प्रकारच्या कथा दाखवल्या जात आहेत आणि कोणत्या कथा दाबल्या जात आहेत हे स्पष्ट होते. (Still From Film) हेही पाहा- रोहित शर्मा ते विराट कोहली; ‘या फलंदाजांची बॅट आयपीएलमध्ये तळपली, ठोकल्या आहेत ५ हजारांहून अधिक धावा…

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?