-
सलमान खान सध्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सलमान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं म्हटलं जात आहे.
-
सलमानचा कोणताही चित्रपट असो तो सुपरहिट होतोच असंही म्हटलं जातं. पण, सलमानचे असे बरेच चित्रपट आहेत, ज्यांना IMDbवर १० पैकी अत्यंत वाईट रेटिंग मिळाले होते आणि हे चित्रपट फ्लॉप झाले होते. सलमानचे हे वाईट चित्रपट कोणते? जाणून घ्या…
-
मैं अॅण्ड मिसेज खन्ना – २००९मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एका जोडप्याची गोष्ट होती. सलमान व करीना कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या अजिबात पसंतीस उतरला नव्हता. या चित्रपटाला फक्त ३.५ रेटिंग मिळाले होते.
-
गॉड तुस्सी ग्रेट हो – सलमान खानचा हा चित्रपट हॉलीवूडच्या ‘ऑलमाइटी गॉड’चा हिंदी रिमेक होता. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला. सलमानच्या या चित्रपटाला ३.७ रेटिंग मिळाले होते.
-
ट्यूबलाइट – सलमानच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत ‘ट्युबलाइट’चं आवर्जुन नाव घेतलं जात. या चित्रपटाला IMDbवर फक्त ३.९ रेटिंग मिळाले होते.
-
शादी करके फंस गया – या चित्रपटात सलमान खान शिल्पा शेट्टीसह पाहायला मिळाला. २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त ११ कोटींची केली होती
-
युवराज – २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, कतरिना कैफ, मिथुन चक्रवर्ती असे अनेक कलाकार झळकले होते. या चित्रपटाला IMDbवर फक्त ४.१ रेटिंग मिळाले होते.
-
प्रेम रतन धन पायो – सलमान खान व सोनम कपूरच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा होती. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाला फक्त १० पैक ४.४ रेटिंग मिळाले होते.
-
रेस ३ – सलमान खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाची कथा व संवाद प्रेक्षकांना अजिबात आवडले नाहीत. IMDbवर ‘रेस ३’ चित्रपटाला १० पैकी १.९ मिळाले होते. ( सर्व फोटो सौजन्य – सलमान खान इन्स्टाग्राम आणि IMDb )

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO