-
बॉलिवूडचा किंग खान हा चित्रपट उद्योगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, कलाकार व्यवसायातूनही भरपूर कमाई करतात. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
शाहरुख खान हा अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याचा दारूचाही व्यवसाय आहे आणि तो त्यातून खूप कमाई करतो. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
या अभिनेत्याने गेल्या वर्षीच दारूच्या जगातील व्यवसाय सुरू केला आणि फक्त एका वर्षातच त्याचा ब्रँड जगातील सर्वोत्तमपैकी एक बनला आहे. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
बर्लिन इंटरनॅशनल स्पिरिट्स स्पर्धा (BISC) दरवर्षी बर्लिन, जर्मनी येथे आयोजित केली जाते, ज्यामध्ये जगातील अव्वल लक्झरी मद्य ब्रँड एकत्र येतात. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
यावर्षी शाहरुख खानचा व्हिस्की ब्रँड डायव्होलनेही (D’yavol ) या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या ब्रँडला १०० पैकी ९५ गुण मिळाले. यासोबतच त्याच्या लक्झरी ब्रँडने स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
गेल्या वर्षी डायव्होलला सर्वोत्कृष्ट स्कॉच पुरस्कार देखील मिळाला होता. त्याच्या ब्रँन्डला बेस्ट ऑफ क्लास, ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्कीचा किताब देखील मिळाला आहे. हा पुरस्कार न्यू यॉर्क वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटिशन २०२४ मध्ये मिळाला. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यन खानसोबत डायव्होल व्हिस्कीचा व्यवसाय सुरू केला. त्याची कंपनी तीन प्रकारची दारू बनवते. (Photo: Shahrukh Khan/Insta)
-
किंमत
mansionz.in वेबसाइटनुसार, D’yavol सिंगल इस्टेट व्होडकाची किंमत पाच हजार रुपये आहे. (Photo: Team Shah Rukh Khan/FB) -
livechers.com या वेबसाइटनुसार, D’yavol Inception Blended Malt Scotch Whisky ची किंमत 6,300 रुपये आहे. (Photo: Shahrukh Khan/Insta)
-
यासोबतच, डायव्होलची प्रीमियम स्कॉच व्हिस्की देखील उपलब्ध आहे जीची किंमत महाराष्ट्रात सुमारे ५,३५० रुपये आणि गोव्यात ४,५०० रुपये आहे. (Photo: Team Shah Rukh Khan/FB)
-
टीप: दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. लोकसत्ता कोणत्याही प्रकारच्या दारू आणि इतर मादक पदार्थांना प्रोत्साहन देत नाही. (Photo Pexels)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई